दुकानाचा लायसन कसं काढायचं.? How to Get a Wine Shop License in India?
![]() |
दुकानाचा लायसन कसं काढायचं.? How to Get a Wine Shop License in India.? |
या सर्व प्रकारात उत्पादन आणि विक्री असे दोन प्रकार ही पडतात पण आपण सध्या किरकोळ विक्रीसाठी काय प्रोसेस आहे ते बघूया.
पेयांसाठीचे परवाने
एफएल (FL) - फॉरेन लिकर म्हणजे विदेशी मद्य
एफएलबीआर (FLBR ) - विदेशी मद्य पण बिअट
नमुना E-2- वाईनसाठीचा परवाना
सीएल (CL) - कंट्री लिकर म्हणजेच देशी दारुचा परवाना
● एफएल (FL) - फॉरेन लिकर म्हणजे विदेशी मद्य :-
त्या प्रकारात सरकारने परत वेगवेगळे प्रकार पाडले आहेत. FL2 म्हणजेच विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना आणि विषय असा आहे की 1973 पासून हा मेन परवाना द्यायला सरकारने बंदी घातली आहे. नंतर येतो FL3 म्हणजेच हॉटेलमध्ये उत्पादन शुल्क भरलेली भारतीय बनावटीच विदेशी मध्य आणि इतर विदेशी मद्याचे किरकोळ विक्री करण्यासाठी चा परवाना थोडक्यात हॉटेल आणि बार हे एकत्रित ज्या ठिकाणी असतात त्या ते हे लायसन काढले तर त्यात तुम्ही फॉरेन विकार आणि बियर हे दोन्ही विकू शकता. पुढे आहे FL4 म्हणजे उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मघ्य आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मघ्य नोंदणीकृत क्लब मध्ये विक्री करण्यासाठीचा परवाना थोडक्यात परमिट रूम वो. आत्ता पुढे जाऊ.
● एफएलबीआर (FLBR ) - विदेशी मद्य पण बिअट :-
आता बियर चा विषय त्यात FLBR2 म्हणजे सीलबंद बाटल्यांमध्ये बियरची किरकोळ विक्री करण्यासाठी चा परवान. त्यानंतर नमुना E म्हणजे सून्न मधील म्हणजेच बिअर व वाईनची खाद्यबद्य हॉटेल कॅन्टींग आणि क्लब मध्ये विकण्यासाठी चा परवाना. आता वाईन विकायची झालं नमुना E2 चा परवाना काढायचा. त्यात खाद्यग्रह, हॉटेल, क्लब मध्ये यांची किरकोळ विक्री करता येते मग नंबर लागतो तो म्हणजे
● सीएल (CL) - कंट्री लिकर म्हणजेच देशी दारुचा परवाना :-
CL3 या प्रकारात देशी दारू किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना मिळतो. पण 1973 पासून नवीन परवाना देणे हे शासनाने बंद केला आहे. आता फक्त लायसन ट्रान्सफर करता येतं. CLFL3 या प्रकारात देशी दारूच्या सीलबंद बाटल्यामध्ये किरकोळ विक्री करण्यासाठी परवाना मिळतो. लायसन्सचे टाईप सांगितले मिळण्यासाठीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगतो.
इंटरनेटच्या जमान्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग काय मागं नाय मागच्या काही वर्षापासून शासनाने हे लायसन काढायची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तर यासाठी एक्सट्रॅक्ट ऑफिसमध्ये जाऊन एप्लीकेशन फॉर्म भरावा लागत होता. पण मागच्या काही वर्षापासून आता मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या HTTPS://EXCISESERVICES.MAHAONLINE.GOV.IN या वेबसाईटवर जाऊन ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन करता येते. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि इतर कागदपत्र ही ऑनलाईन अपलोड करावी लागतात. पण कुठल्या लायसन्स साठी कुठली कागदपत्र लागतात.
》लायसन्ससाठी कुठली कागदपत्रं लागतात ? :-
● FL :- हॉटेलचं लायसन्स, अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स, क्लब असेल तर त्याचं नोंदणीपत्र, बँकेचं हमीपत्र, आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र, आयकर आणि विक्रीकर प्रमाणपत्र
● बिअर आणि वाईन :- नकाशा, आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं | प्रतिज्ञापत्र, बँकेचं हमीपत्र, डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात एका वर्षाच्या | लायसन्सचं जेवढं शुल्क असतं तेवढं डिपॉजिट आणि जिल्हा समितीची शिफारस
● देशी दारू :- ऐपत पत्र, आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र इत्यादी.
हा सगळा अर्ज केल्यानंतर लगेच लायसन मिळतं असं नसतं
अर्ज केल्यानंतर पुढं काय ?
• जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत होते.
• यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक सदस्य सचिव त्यांच्यासमोर अर्जासंबंधीची सुनावणी आणि पडताळणी होते.
• मग येतं शुल्क, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही शुल्क रचना प्रत्येक वर्षी बदलत जाते.
• हे शुल्क नवीन लायसन्स काढताना आणि त्या लायसन्सचं प्रत्येक वर्षी नुतणीकरण करताना भरावं लागतं.
* आता ते शुल्क किती घ्यायचे हे ठरतं लोकसंख्येवर म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर FL2 च घेऊ.
शुल्क किती असतं..?
● FL-2 :-
》लोकसंख्या 50 हजार :- शुल्क 86 हजार 625 रुपये
》लोकसंख्या 50 हजार ते 1 लाख :- शुल्क 1 लाख 15 हजार 500 रुपये
》लोकसंख्या 1 लाख ते 2 लाख :- 50 हजार 2 लाख 31 हजार रुपये
कमी जास्त फरकात FL-3, FLBR अश्या सगळ्या लायसन्स साठी असंच शुल्क आकारला जात (ही आकडेवारी शासनाच्या धोरणानुसार बदलूही शकते)
सगळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लायसन मिळू शकतं.
आता जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल तर परवाने विकू शकता का..? तर हो हे सगळे परवाने आपण विकू शकतो. यासाठी लागणारा शासनाचा विशेष अधिकारी शुल्क भरून संबंधित परवाना दुसऱ्यांच्या नावावर करू शकता. ज्याचे नियम कठोर आहेत ही होती प्रोसिजर दारूच्या दुकानाचा लायसन कसं काढायचं याची. तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व अशाच माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा.
WHATSAPP GROUP LINK
..............धन्यवाद..............
0 Comments