12 वी नंतरचे हे 5 कोर्स तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात | Career Option after 12th

बारावीचा निकाल लागला, पण आता पुढं काय ? बी ए, बी कॉम, बी एस्सी, इंजिनियरिंग, कॉम्पुटर कोर्सेस, मेडिकल कोर्सेस, बँकिंग कोर्सेस केलेल्या मोठ्या भावा बहिणीचं, नातेवाईकांचं ऐकून डोकं काम करत नाहीये. करिअर ओरिएंटेड कोर्सेसची माहिती पाहिजे. मग आम्ही हाय ना, आम्ही तुम्हाला काही स्किल डेव्हलेपमेंट आणि तातडीनं जॉब मिळवून देणाऱ्या काही कोर्सेसची माहिती देणारंय.. नमस्कार मि अनिकेत तुम्हाला तर माहितीये आपला पार्टनरच वेगळाय .......

12 वी नंतरचे हे 5 कोर्स तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात | Career Option after 12th
12 वी नंतरचे हे 5 कोर्स तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात | Career Option after 12th


वाचनाला सुरू करण्याच्या आधी सांगतो सदर सांगितलेली माहिती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तींचे अनुभव आणि नॉलेज यांच्याद्वारे कलेक्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमच्या पालकांशी किंवा अन्य तज्ञ व्यक्तीशी चर्चा करूनच कोर्स करायचा की नाही याचा निर्णय घ्या. चला तर मग जाणुन घेऊया कि ते 5 कोर्स कोनचे आहेत.

1). सायबर सिक्युरिटी (Cyber Security) :- 
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने वाढतेय. आणि त्या क्षेत्रात सध्या हजारो नवीन संधी निर्माण होत आहेत. आयटी कंपनी पासून मोठ्या मोठ्या कॉरर्पोरेट कंपन्या, नवीन स्टार्टअप, पब्लिक किंवा प्रायव्हेट बँका, युनिकॉम कंपन्या, सरकारी संस्था, किंवा अगदी शैक्षणिक संस्था, सगळं डिजिटल व्हायला लागले. अन त्यांना सायबर सिक्युरिटीची मोठ्या प्रमाणात गरज वाटू लागली आहे. त्यासाठी ते मार्केट मधल्या नामांकित कंपन्यांना ऑनलाइन सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात अगदी सरकारी संस्था सुद्धा. त्याचप्रमाणे हल्ली ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण किती वाढले हे तुम्हाला वेगळं सांगायला नको त्यामुळे बँका किंवा पेमेंट ॲप च्या सुविधा प्रोव्हाइड करणार्या कंपन्या, स्टार्ट अप सगळेच त्यांच्या ग्राहकाच्या सुरक्षा बद्दल जागरूक असतात. सायबर सिक्युरिटी तज्ञांची रिक्वायरमेंट दिवसानो दिवस वाढते. वाढत्या मागणीमुळे आयटी क्षेत्रात काम करू वाटणाऱ्या मुलांसाठी आता बारावीनंतरच इथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटी सारखे कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. चांगले इन्स्टिट्यूट ची माहिती जी इन्स्टिट्यूट तुम्हाला कोर्स नंतर जॉब ची हम्मी देते तिथे जाऊन तुम्ही कोर्स करू शकता. सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, वडोदरा, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे अशा कोर्सेस च्या नामांकित इन्स्टिट्यूट आहेत इंटरनेटवर तुम्हाला त्यांची नावे कळू शकतात. 'Career Option after 12th'

● कोर्स कालावधी :- सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत इतका असतो 

● कोर्स फि :- 15,000 रुपयांपासून 1,50,000 रुपयांपर्यंत असते

● मास्टर डिग्री साठी:-  तीन वर्षांचा काळ आणि 4,50,000 फी आकारली जाते

● महिना :- 25,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतात 


2). डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing ) :- 
आता ज्यांना याबद्दल माहिती नसते किंवा जाणून घ्यायची इच्छा असते त्यांच्यापर्यत खूप चुकीच्या पद्धतीने काही लोकल संस्था डिजिटल मार्केटिंग प्रेसेंट करतात. आणि त्यामुळे सध्या डिजिटल मार्केटिंग खूप बदनाम झाली आहे. पण खरंतर जे लोक इंटरनेटवरून बिझनेस करतात पैसे कमावतात त्यांना डिजिटल मार्केटिंग चं महत्व काय हे पक्क माहीत असेल. इंटरनेटवर ज्यांचा बिजनेस आहे. त्यांना यांची अतिशय बेसिक गरज आहे आणि त्यासाठी अनेक बिजनेस ओनर डिजिटल मार्केटिंग शिकलेल्या मुलांचा शोध घेत असतात.  डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया हँडलिंग, कस्टमर रिलेशनशिप, कन्टेन्ट मॅनेजमेंट, अशा अनेक गोष्टी आहेत जगातला 80 टक्के ग्राहक आता इंटरनेटवर आहे. त्यामुळे कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इच्छुक असतात. प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट ची सध्या खूप गरज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या ठिकाणी तुम्हाला जॉबची गॅरंटी देणारे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पाहायला मिळतील त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा आधार घ्या किंवा तज्ञांशी चर्चा करा."Career Option after 12th"

● कोर्स कालावधी :- तीन महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असतो.

● कोर्से फी :-  10,000 रुपयांपासून 50,000 पर्यंत असते.

 पेमेंट  :-  15,000 रुपयांपासून 30,000 रुपये पर्यंत पेमेंट मिळू शकत.

*एवढेच काय कोर्स करून तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंगची फॉर्म ही सुरु करू शकता....

3). नर्सिग ( Nursing ) :-
कोरोना नंतर देशात मोठ्या संख्येने मेडिकल प्रोफेशन ची गरज भासू लागली आहे. मागच्या एका वर्षात हजारो नवीन मुलं मुली मेडिकल क्षेत्रात जॉबला लागल्याची नोंद आहे. महत्त्वाचं म्हणजे बारावीनंतर तुम्ही हे कोर्सेस करू शकता. त्यात सायन्स बॅकग्राऊंड असेल तर उत्तमच यात डिग्री आणि डिप्लोमा असे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षाही द्यावी लागू शकते. पण ते कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, मेडिकल, रक्त लघवी तपासणी केंद्र, एक्स-रे सेंटर मध्ये जॉब मिळवु शकता.Career Option after 12th

कोर्सची फीस :-  वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आकारले जाते तरी 50,000 एक 1,00,000

 पेमेंट :- तुम्हाला तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार 15,000 पासून ते 50,000 पर्यंत

4). ग्राफिक डिझाईन ( Graphic Designer ) :- 
हा कोर्स डिजिटल मार्केटिंग इतकाच महत्वाचा आहे. आणि वेगवेगळ्या न्यूज, मीडिया पोर्टलस, इंटरटेनमेंट हाऊसेस, फोटो स्टुडिओ, पीआर स्टुडिओ, मोठे youtube चॅनल अशा ठिकाणी अशा ग्राफिक डिझायनर एक्स्पोर्ट ची खूप म्हणजे खूप गरज असते. पण मित्रांनो लक्षात घ्या ग्राफिक डिझाईन म्हणजे निव्वळ फोटो एडिटिंग नाही त्यासाठी तुमच्याकडे खास क्रिएटिव्ह आयडिया असणं गरजेचं आहे. फोटोशॉप, कोरल डाॅर्वा, अफटर इफेक्ट्स, यासारख्या सॉफ्टवेअरचे डीप नॉलेज घेण्याची तयारी आणि त्या जोडीला उत्तम क्रिएटिव्हिटीचं ज्ञान असेल तर या क्षेत्रावर तुम्ही राज करू शकता. जवळच्या इन्स्टिट्यूट म्हणाल तर मुंबई, पुणे, नाशिक, लातूर या ठिकाणी जाऊ शकतात. त्यातल्या त्यात पुणे बेस्ट राहील.Career Option after 12th

●कोर्स ची फिस :- 10,000 पासून स्टार्ट होते.

● पेमेंट :- सुरुवातीला किमान 20,000 ते 50,000 पर्यंत तुम्ही मिळवु शकता.

5). व्हिडिओ एडिटिंग (video Editing) :- 
न्यूज, मीडिया, स्टुडिओ, सिनेमा हाऊसेस, फोटो स्टुडिओ अशा कितीतरी ठिकाणी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर ची गरज असते. लग्नातले व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर शंभर टक्के फोटो स्टुडिओ मालकाला व्हिडिओ एडिटर लागतो म्हणजे लागतो. त्यासाठी तुमच्याकडे ॲनिमेशन ग्राफिक्स, टेक्स्ट म्युझिक इमेजेस याचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक असतं जे की तुम्हाला कोर्स करून मिळू शकत. पण महत्त्वाच म्हणजे त्यासाठी तुमचं मन क्रिएटिव्ह असलं पाहिजे. तुम्ही मागे एक न्यूज ऐकली असेलच 18 वर्षाच्या पोराचं एडिटिंग बघून 'KGF' सिनेमाचा डायरेक्टर त्याचा फॅन झाला. आणि त्याने त्या मुलाकडून "KGF Chapter 2" हा सिनेमा एडिट करून घेतला. काय सांगता तुम्हाला तसा एखादा खमक्या प्रोजेक्ट मिळू शकतो. बाकी त्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या उत्तम इन्स्टिट्यूट मधून व्हिडिओ एडिटिंग कोर्स करण गरजेच आहे. मुंबईमध्ये सेंट झेवियर्स आणि पुण्यातलं एसटीआय त्यासाठी खूप फेमस आहे. पण तिथली फी सुद्धा खूप तगडी आहे सुरुवातीच्या काळात तुम्ही जॉब मिळवून देणारे इन्स्टिट्यूटला प्रेफर करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग तुम्ही घरी बसूनही करू शकता. Career Option after 12th

 ● पेमेंट :- 25,000 पासून 1,00,000 पर्यंत

*योग्य कोर्स आणि इन्स्टिट्यूट साठी इंटरनेटची मदत घ्या 


पुढच्या Part मधे आपण या क्षेत्रांना धरूनच ऍडव्हान्स फोटोग्राफी, सिनेमॅटिक, व्हिडिओग्राफी, ॲनिमेशन आणि youtube मध्ये करिअर होऊ शकतं का..?  याची माहिती घेणार आहोत. त्या काळात हे आहे म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सचा का सुकावणार आहे त्या दृष्टीने आता जे लोक पाऊल उचलतील तेच लोक पुढे जाऊन मिलियन डॉलरचा जॉब किंवा व्यवसाय करू शकतील. काही तज्ञांचा दावा त्याबद्दलही आपण नेक्स्ट Part मधे डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. 

* ग्राफिक डिझाईन (Graphic Designer) आणि डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing ) या विषयावर डिप आणि डिटेल्स मधे माहिती हावी असेल तर ते देखील Comments मध्ये नक्की सांगा..!

पण यामध्ये सांगितलेल्या कोर्स बद्दल तुमची जी काही मत असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपला WhatsApp Group ज्वाईन करा....

WHATSAPP GROUP LINK 

                    CLICK HERE 

...................धन्यवाद.....................