2000 Rupee Note : दोन हजार रुपयांच्या नोटा होनार बंद .! तुमच्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार? जाणून घ्या
![]() |
2000 Rupee Note : दोन हजार रुपयांच्या नोटा होनार बंद .! तुमच्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार? जाणून घ्या |
RBI ने चलनात असलेली दोन हजार रुपायांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही नोट चलनात असणार आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच 2016 साली 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. पण आता सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात सध्या भारतात दोन हजार रुपयांच्या किती नोटा चलनात आहेत आणि किती रकमेपर्यंत नोटा बदलू शकतो ते.
किती रकमेपर्यंत नोटा बदलू शकतो.?
31 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. RBI च्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
RBI ने बँकांना दिलेले आदेश :
RBI ने आदेशात बँकांना नव्याने दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यास मनाई केली आहे. RBI ने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांना बँकांच्या एटीएममधून 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात जिथे बँक नाही तिथे मोबाईल वॅनद्वारे नोटा बदलू शकता, असंही सांगितलं आहे.
"दोन हजार रुपयांच्या नोटा तशा जास्त प्रमाणात चलनात नव्हत्या, असं पाहिलं गेलं आहे. लोकांची रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पर्याप्त स्टॉकमध्ये आहेत.” RBI च्या मते 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा असल्याने 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती.
0 Comments